गीत ४८
प्रतिदिनी यहोवासोबत चालू या
(मीखा ६:८)
१. हात याहाचा धरुनी
चालू नीतीने प्रतिदिनी.
आम्हा हा दिला सन्मान
याहाने ख्रिस्तास वाहुनी.
ही प्रेमदया अगाध,
फेडू कर्ज हे कसे?
वाहू तन, मन, धन याहाला,
ऐकू नम्रतेने त्याचे.
२. दाटुनी येता काळोखे
मेघ नाशाचे जगावरी,
आणू पाहती विरोधी,
सावट भीतीचे आम्हावरी.
ना भिणार त्या वैऱ्यांना,
याह आम्हा सांभाळी.
चालू नित्य याहासंगे,
त्याच्या तेजोमय प्रकाशी.
३. देई सामर्थ्य याहाचा
आत्मा आणि वचन त्याचे.
देई तो साहाय्य आम्हा
प्रेमळ, स्नेही बांधवांयोगे.
ऐकुनी विनंत्या आमच्या
देई सांत्वन, धीर आम्हा.
हात धरिता याहाचा,
साथ तो कधी सोडे ना!
(उत्प. ५:२४; ६:९; १ राजे २:३, ४ देखील पाहा.)