व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ११

यहोवाचे मन हर्षविणे

यहोवाचे मन हर्षविणे

(नीतिसूत्रे २७:११)

१. याहा, दिले वचन आम्ही,

इच्छा करू तुझी पुरी.

देण्या मना हर्ष तुझ्या,

बापा, सुबुद्धी दे आम्हा.

२. विश्‍वासू दास बुद्धिमान,

देई सुवेळी आम्हा ज्ञान.

तुझे वचन पाळण्या,

देई आम्हा तो प्रेरणा.

३. याहा, करण्या तुझी सेवा,

आत्मा लाभो तुझा आम्हा.

दिसावे फळ जीवनी,

नावा मिळो तुझ्या स्तुती.