व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २७

यहोवाला इमानी राहा!

यहोवाला इमानी राहा!

(निर्गम ३२:२६)

१. दास्यात होतो जगाच्या जेव्हा,

होत्या पायी बेड्या अज्ञानाच्या,

मुक्‍त झालो ज्ञानाने सत्याच्या,

आनंदले मन हे!

(कोरस)

याहाला इमानी

राहण्या झटा!

ना सोडायचा तो

लोकां आपुल्या.

शांतीची सुवार्ता,

या, सांगू सर्वां,

राहील याहाचे

राज्य सर्वदा!

२. हर्षाने याहाची सेवा करू,

चोहीकडे बी सत्याचे पेरू,

बांधवांसंगे याहा नावाजू,

गाऊ त्याचा महिमा!

(कोरस)

याहाला इमानी

राहण्या झटा!

ना सोडायचा तो

लोकां आपुल्या.

शांतीची सुवार्ता,

या, सांगू सर्वां,

राहील याहाचे

राज्य सर्वदा!

३. का थरथरावे वैऱ्‍यां पाहुनी?

राहू याहावरी विसंबुनी.

चाले जो हात त्याचा धरुनी,

त्याला कोणाची भीती?

(कोरस)

याहाला इमानी

राहण्या झटा!

ना सोडायचा तो

लोकां आपुल्या.

शांतीची सुवार्ता,

या, सांगू सर्वां,

राहील याहाचे

राज्य सर्वदा!