व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३९

शांतीचा ठेवा

शांतीचा ठेवा

(योहान १४:२७)

१. याह दाता शांतीचा,

स्रोत एकीचा,

करील दिगंतरी

अंत युद्धांचा.

ख्रिस्त येशू राजकुमार

आहे शांतीचा,

जिंकेल संग्राम तो

सत्य नीतीचा!

२. आम्ही शस्त्रे धारदार

सारी मोडुनी,

साधने सलोख्याची

केली त्यांतुनी.

क्षमा करुनी चुका

राखू ही शांती.

चालू या पदोपदी

ख्रिस्तासोबती.

३. शांती फळ नीतीचे,

देवज्ञानाचे.

विनविता याहाला,

आम्हा ते मिळे.

देण्या इतरांनाही

राहू या आतुर.

स्थापील राज्य याहाचे

शांती सर्वदूर!