व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १७

साक्षीदारांनो, पुढे चला!

साक्षीदारांनो, पुढे चला!

(लूक १६:१६)

१. ठाम, साहसी आम्ही आवेशी, अथक!

सुवार्तेचे आहो आनंदी उद्‌घोषक!

सैतान करितो जरी वार,

घेतला आम्ही याहाचा कैवार.

(कोरस)

चला बंधुंनो पुढे, होउनी निडर,

ध्येयावरी आपुल्या रोखू या नजर!

सर्वां सांगू या वार्ता नंदनवनाची,

आणील शांती जे सर्वकाळाची!

२. वाट याहाच्या सैनिकाची ना सोपी,

विरोधी कुटिल, कंटके विखुरती,

ना पाऊल ढळे तरी त्याचे,

मोहवे ना त्याला सौख्य जगाचे.

(कोरस)

चला बंधुंनो पुढे, होउनी निडर,

ध्येयावरी आपुल्या रोखू या नजर!

सर्वां सांगू या वार्ता नंदनवनाची,

आणील शांती जे सर्वकाळाची!

३. याहाच्या नावा कलंक लावुनी,

नाकारिले त्याच्या राज्याला दुष्टांनी,

स्तवन करू राज्याचे त्याच्या,

महिमा देऊ नावाला याहाच्या!

(कोरस)

चला बंधुंनो पुढे, होउनी निडर,

ध्येयावरी आपुल्या रोखू या नजर!

सर्वां सांगू या वार्ता नंदनवनाची,

आणील शांती जे सर्वकाळाची!