गीत १२
सार्वकालिक जीवनाची प्रतिज्ञा
१. जीवन देईल सदाचे
याह सर्व लीन जनां.
पुसेल आसवे त्यांची,
लोपतील वेदना!
(कोरस)
जीवन सदाचे,
शांती व सुखाचे,
देवाची प्रतिज्ञा,
नाही स्वप्न हे!
२. साज सौंदर्याचा लेऊन,
नटली पृथ्वी पाहा!
मावेना हर्ष गगनी
देवाच्या मुलांचा!
(कोरस)
जीवन सदाचे,
शांती व सुखाचे,
देवाची प्रतिज्ञा,
नाही स्वप्न हे!
३. पाणावती आज डोळे,
मृत प्रियांसाठी ज्या,
वाहतील भेटुनी त्यां
आनंदाच्या धारा!
(कोरस)
जीवन सदाचे,
शांती व सुखाचे,
देवाची प्रतिज्ञा,
नाही स्वप्न हे!
(यश. २५:८; लूक २३:४३; योहा. ११:२५; प्रकटी. २१:४ देखील पाहा.)