व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब ३३-३७

खरा मित्र उत्तेजन मिळेल असा सल्ला देतो

खरा मित्र उत्तेजन मिळेल असा सल्ला देतो

अलीहूचा सल्ला आणि ईयोबाबरोबरचे त्याचे वागणे अलीफज, बिल्दद आणि सोफर या तिघांपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. त्याने दाखवून दिलं, की तो ईयोबाचा खरा मित्र आहे. त्याचे बोलणे प्रभावी होते. आपण सर्वांनी खरंच त्याचे अनुकरण केले पाहिजे.

प्रभावीपणे सल्ला देणाऱ्याचे गुण

अलीहूने उत्तम उदाहरण मांडलं

३२:४-७, ११, १२; ३३:१

 

  • सहनशील

  • लक्ष देऊन ऐकणारा

  • आदरानं बोलणारा

 
  • वयानं मोठं असलेल्या इतरांचं बोलणं संपेपर्यंत अलीहू थांबून राहिला

  • सल्ला देण्याआधी, त्याने इतरांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. यामुळे त्याला, चर्चा होत असलेला विषय नीट समजला

  • सल्ला देताना त्याने ईयोबाचे नाव घेतले आणि एका मित्राप्रमाणे त्याच्याशी बोलला

 

३३:६, ७, ३२

 

  • नम्र

  • प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे त्याच्याकडे निःसंकोचपणे कोणीही जाऊ शकतं

  • इतरांचं दुःख समजून घेणारा

 
  • अलीहू नम्र व दयाळू होता. आपणही अपरिपूर्ण आहोत, हे त्याने कबूल केले

  • ईयोबाला सहन करावं लागत असलेलं दुःख त्यालाही समजलं

 

३३:२४, २५; ३५:२, 

 

  • संतुलित दृष्टिकोन बाळगणारा

  • दयाळू

  • यहोवाचा दृष्टिकोन बाळगणारा

 
  • अलीहूने अतिशय दयाळूपणे ईयोबाच्या लक्षात आणून दिलं, की त्याचा दृष्टिकोन संतुलित नव्हता

  • स्वतःच्या धार्मिकतेचाच विचार करणं महत्त्वाचं नाही, तर निर्माणकर्त्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे, ही गोष्ट समजण्यास त्याने ईयोबाला मदत केली

  • अलीहूच्या उचित सल्ल्यामुळे, यहोवाकडून आणखी बोध घेण्यास ईयोब तयार झाला