जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका एप्रिल २०१७
नमुना सादरीकरणं
आपल्या पत्रिकांसाठी आणि देवाच्या राज्याबद्दल सत्य शिकवा यासाठी नमुना सादरीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यहोवाला तुमच्या विचारसरणीला व आचरणारला आकार देऊ द्या
महान कुंभार आपल्या आध्यात्मिक गुणांना आकार देतो, पण आपणसुद्धा आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे.
ख्रिस्ती जीवन
त्यांचं मनापासून स्वागत करा
जेव्हा नवीन लोक आपल्या सभांना येतात तेव्हा त्यांना आपल्यातलं ख्रिस्ती प्रेम पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली पाहिजे. राज्य सभागृहातील प्रेमळ आणि मैत्रिपूर्ण वातावरण आणखी वाढवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे हातभार लावू शकता?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
तुमच्याजवळ यहोवाला “ओळखणारे हृदय” आहे का?
यिर्मया अध्याय २४ मध्ये यहोवा लोकांची तुलना अंजिरांशी करतो. चांगल्या अंजिरांसारखे कोण होते, आणि आपण त्यांचं अनुकरण कसे करू शकतो?
ख्रिस्ती जीवन
तुम्ही अक्रियाशील ख्रिस्ती व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकता
अक्रियाशील असलेलेही यहोवा देवासाठी मौल्यवान असतात. तर मग, त्यांना मंडळीत परत येण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
यिर्मयासारखं धैर्यवान व्हा
यरुशलेमच्या नाशाविषयी यिर्मयाने ४० वर्षं भविष्यवाणी केली. तो इतकी वर्षं धैर्य कसं दाखवू शकला?
ख्रिस्ती जीवन
धैर्य उत्पन्न करणारी राज्यगीतं
राज्यगीतं गायल्यामुळे झाक्सेनहाउसन छळ छावणीमधल्या ख्रिश्चनांना उभारी मिळाली. जेव्हा आपल्याला छळाचा सामना करावा लागतो तेव्हा या गीतांमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
नवा करार याविषयी यहोवाने भविष्यवाणी केली होती
नियमशास्त्राचा करार आणि नवा करार यांमध्ये काय फरक आहे आणि या नव्या करारामुळे सर्वकाळाचे आशीर्वाद कसे मिळतील?