व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

तुम्ही अक्रियाशील ख्रिस्ती व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकता

तुम्ही अक्रियाशील ख्रिस्ती व्यक्तीला प्रोत्साहन देऊ शकता

अक्रियाशील असलेले बरेच ख्रिस्ती बंधुभगिनी दरवर्षी स्मारकविधीसाठी उपस्थित राहतात. या बंधुभगिनींनी जीवनाच्या शर्यतीत धावण्यास सुरवात तर केली होती, पण काही कारणांमुळे त्यांची गती कमी झाली. यांपैकी काही कारणांची चर्चा यहोवाकडं परत या, या माहितीपत्रकात करण्यात आली आहे. (इब्री १२:१) हे बंधुभगिनी अक्रियाशील असले तरी ते यहोवासाठी अजूनही खूप मौल्यवान आहेत. कारण, यहोवाने त्यांनाही आपल्या पुत्राच्या रक्ताचं मोल देऊन विकत घेतलं आहे. (प्रेका २०:२८; १पेत्र १:१८, १९) तर मग, या बंधुभगिनींना मंडळीत परत येण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो?

ज्याप्रमाणे एक मेंढपाळ कळपातून भरकटलेल्या मेंढराला शोधण्यासाठी भरपूर मेहनत घेतो, अगदी त्याचप्रमाणे मंडळीतले वडील अक्रियाशील झालेल्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतात. (लूक १५:४-७) यावरून खरंतर यहोवाची प्रेमळ काळजी दिसून येते. (यिर्म २३:३, ४) पण, फक्त मंडळीतले वडीलच नाही तर आपण सर्व जण अक्रियाशील असलेल्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. दया आणि सहानुभूती दाखवण्यासाठी आपण जर मेहनत घेतली, तर यहोवाचं मन आनंदित होईल आणि आपल्यालाही चांगले प्रतिफळ मिळतील. (नीत १९:१७; प्रेका २०:३५) तेव्हा, तुम्ही कोणाला प्रोत्साहन देऊ शकता याचा विचार करा आणि लवकरात लवकर त्यांना मदत करण्यासाठी पावलं उचला.

अक्रियाशील असलेल्यांना प्रोत्साहन द्या हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा:

  • अॅबे जेव्हा अनोळखी असलेल्या एका साक्षीदार बहिणीला भेटली, तेव्हा तिने कोणती पावलं उचलली?

  • अक्रियाशील व्यक्तीला मदत करण्याची जर आपली इच्छा असेल, तर आपण आधी मंडळीतल्या वडिलांना भेटण्याची गरज का आहे?

  • लॉराला दुसऱ्यांदा भेटण्याआधी अॅबेने कशी तयारी केली?

  • लॉराला प्रोत्साहन देताना अॅबेने धीर आणि प्रेम दाखवून कशा प्रकारे हार न मानता तिची मदत केली?

  • लूक १५:८-१० या वचनांमध्ये येशूने जे उदाहरण दिलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?

  • लॉराला मदत करण्यासाठी अॅबे आणि मंडळीतल्या वडिलांनी जी मेहनत घेतली त्याचे कोणते चांगले प्रतिफळ मिळाले?