व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

धैर्य उत्पन्न करणारी राज्यगीतं

धैर्य उत्पन्न करणारी राज्यगीतं

पौल आणि सीला यांनी तुरुंगात असताना गीतं गाऊन देवाची स्तुती केली. (प्रेका १६:२५) तसंच, आधुनिक काळात आपल्या काही विश्वासू बांधवांनीही नाझी जर्मनी इथल्या झाक्सेनहाउसन छळ छावणीमध्ये आणि साइबीरियामध्ये बंदिवासात असताना राज्यगीतं गायली. या उदाहरणांवरून दिसून येतं की, छळाचा सामना करत असलेल्या ख्रिश्चनांमध्ये धैर्य उत्पन्न करण्याची शक्ती गीतांमध्ये आहे.

लवकरच इंग्रजीतलं “सिंग आऊट जॉयफूली” टू जेहोवा, हे नवीन गीतपुस्तक इतर बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध होईल. पण आपल्याकडे जी गीतं उपलब्ध आहेत त्यांचे बोल आपण पाठ करू शकतो; त्यांचा आपण आपल्या कौटुंबिक उपासनेदरम्यान सराव करू शकतो. (इफि ५:१९) मग, जेव्हा आपल्याला छळाचा सामना करावा लागेल तेव्हा पवित्र आत्मा ही गीते आठवायला आपल्याला मदत करेल. राज्यगीतांमुळे आशेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला मदत होते. आपण जेव्हा छळाचा सामना करतो तेव्हा या गीतांमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपल्या प्रसन्न मनामुळे, उभारी देणारे गीताचे बोल आपल्याला “आनंदाने उच्चस्वरे गायन” करण्यासाठी प्रेरित करतात. (१इत १५:१६; स्तो ३३:१-३) तर मग, आपल्या राज्यगीतांचा आपण पुरेपूर उपयोग करू या!

एक गीत ज्यामुळे कामगारांना प्रोत्साहन मिळालं हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:

  • कोणत्या परिस्थितीमुळे बंधू फ्रॉस्ट यांना एक गीत लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली?

  • झाक्सेनहाउसन छळ छावणीमध्ये असलेल्या बांधवांना या गीतामुळे प्रोत्साहन कसं मिळालं?

  • दैनंदिन जीवनातल्या कोणत्या परिस्थितींत राज्यगीतांमुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकतं?

  • तुम्हाला कोणती राज्यगीतं पाठ करायला आवडतील?