व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

त्यांचं मनापासून स्वागत करा

त्यांचं मनापासून स्वागत करा

पण नेमकं कोणाचं? आपल्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणाऱ्या सर्वांचंच आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे; मग ते पहिल्यांदाच आपल्या सभांना आलेले असोत किंवा मग बऱ्याच वर्षांपासून. (रोम १५:७; इब्री १३:२) पुढील परिस्थितीचा विचार करा: समजा इतर देशांतून काही बंधुभगिनी आपल्या मंडळीला भेट देण्यासाठी आले आहेत किंवा मग अक्रियाशील झालेली एखादी ख्रिस्ती व्यक्ती बऱ्याच वर्षांनंतर सभांना उपस्थित राहिली आहे. मग अशा वेळी जर कोणी त्यांचं मनापासून स्वागत केलं तर त्यांना कसं वाटेल? समजा तुम्ही त्यांच्या ठिकाणी असता तर तुम्हीही नक्कीच याची मनापासून कदर केली असती. (मत्त ७:१२) तर मग, राज्य सभागृहात येणाऱ्या नवीन लोकांना सभेच्या आधी आणि नंतर भेटण्यासाठी थोडी जास्त मेहनत घेण्याची तुमची तयारी आहे का? आपण असं केलं तर मंडळीत एक प्रेमळ आणि मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होते. तसंच, यामुळे यहोवाच्या नावाचाही आदर होतो. (मत्त ५:१६) हे खरं आहे, की प्रत्येक व्यक्तीशी बोलणं आपल्याला शक्य होणार नाही. पण आपण जर मेहनत घेतली, तर सर्वांना मंडळीत आल्यावर आपलंसं वाटेल. *

आपण फक्त स्मारकविधीसारख्या खास प्रसंगांदरम्यानच मनापासून पाहुणचार दाखवत नाही, तर प्रत्येक वेळी दाखवतो. जेव्हा नवीन लोक आपल्यामध्ये असलेलं ख्रिस्ती प्रेम पाहतात आणि अनुभवतात, तेव्हा तेसुद्धा देवाची स्तुती करण्यासाठी आणि आपल्यासोबत त्याची शुद्ध उपासना करण्यासाठी प्रेरित होतात.—योह १३:३५.

^ परि. 3 पण समजा बहिष्कृत करण्यात आलेले किंवा ज्यांनी स्वतःहून मंडळीशी आपलं नातं तोडलं आहे ते सभेत आले तर काय? बायबलमधील तत्त्वं हे स्पष्टपणे दाखवून देतात की अशांसोबत आपण बोलण्याचं टाळलं पाहिजे.—१कर ५:११; २यो १०.