जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका एप्रिल २०१८
चर्चेसाठी नमुने
बायबल आणि आनंदी जीवनाबद्दल चर्चेची शृंखला.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
वल्हांडण सण आणि स्मारकविधी यांतल्या समानता व भिन्नता
वल्हांडण सण स्मारकविधीला चित्रित करत नसला, तरीही या सणापासून आपण बरंच काही शिकू शकतो.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
जा शिष्य करा—का, कुठे आणि कसं?
येशूच्या सर्व आज्ञा लोकांना पाळायला शिकवणे म्हणजे शिष्य बनवणे. यात विद्यार्थ्याला येशूने शिकवलेल्या गोष्टी लागू करायला आणि त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करायला शिकवणं सामील आहे.
ख्रिस्ती जीवन
शिष्य बनवण्यासाठी प्रचार करणं आणि शिकवणं महत्त्वाचं आहे
येशूने आपल्या अनुयायांना शिष्य बनवायला सांगितलं. यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? लोकांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”
मार्क २:५-१२ मध्ये दिलेल्या चमत्कारावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आजारी असताना हा अहवाल आपल्याला धीर धरायला कशी मदत करू शकतो?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
शब्बाथाच्या दिवशी बरं करणं
यहुदी धार्मिक पुढाऱ्यांमुळे येशूला खूप दुःख का झालं होतं? येशूच्या दयेच्या गुणाचं आपण अनुकरण करत आहोत का हे आपल्याला कोणत्या प्रश्नांवरून कळेल?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
येशूकडे मृत प्रियजनांचं पुनरुत्थान करण्याची शक्ती आहे
बायबलमधल्या पुनरुत्थानाच्या अहवालांवर मनन केल्यामुळे भविष्यात होणाऱ्या आपल्या मृत प्रियजनांच्या पुनरुत्थानावर आपला विश्वास दृढ होतो.
ख्रिस्ती जीवन
शिकवण्याच्या आपल्या मुख्य साधनांचा कुशलपणे वापर करा
प्रभावीपणे शिकवण्यासाठी आपल्याला साधनांचा चांगल्या प्रकारे वापर करायला शिकलं पाहिजे? आपली मुख्य साधनं कोणती आहेत? आपण शिकवण्याच्या साधनांचा वापर करण्यात सुधार कसा करू शकतो?