व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

शिकवण्याच्या आपल्या मुख्य साधनांचा कुशलपणे वापर करा

शिकवण्याच्या आपल्या मुख्य साधनांचा कुशलपणे वापर करा

शिष्य बनवणं हे जणू इमारत बांधण्यासारखं आहे. भक्कम बांधकाम करण्यासाठी साधनांचा चांगल्या प्रकारे वापर करायला आपण शिकलं पाहिजे. आपलं मुख्य साधन बायबल आहे. खासकरून याचा कुशलतेने वापर करायला आपण शिकलं पाहिजे. (२ती २:१५) इतर साहित्य आणि व्हिडिओ हीसुद्धा शिकवण्याची साधनं आहेत. शिष्य बनवण्याचं ध्येय लक्षात ठेवून आपण त्यांचासुद्धा प्रभावीपणे वापर करणं शिकलं पाहिजे. *

तुम्ही शिकवण्याच्या साधनांचा वापर करण्यात सुधार कसा करू शकता? (१) तुमच्या सेवाकार्याच्या गट पर्यवेक्षकाची मदत घ्या, (२) अनुभवी प्रचारक किंवा पायनियरसोबत काम करा आणि (३) सराव करत राहा. या प्रकाशनांचा आणि व्हिडिओचा कुशलपणे वापर करण्याचं तुम्ही जसजसं शिकाल, तसतसं होत असलेल्या आध्यात्मिक बांधकामाला हातभार लावण्याचा आनंद तुम्ही अनुभवाल.

नियतकालिक

माहितीपत्रक

पुस्तक

पत्रिका

व्हिडिओ

आमंत्रणपत्रिका

संपर्क कार्ड

^ परि. 3 काही साहित्य, शिकवण्याच्या साधनांच्या यादीत येत नाहीत. कारण विशिष्ट श्रोत्यांना लक्षात ठेवून त्यांची रचना करण्यात आली होती. योग्य वाटल्यास त्यांचा वापर करणं उपयुक्‍त ठरेल.