व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

शिष्य बनवण्यासाठी प्रचार करणं आणि शिकवणं महत्त्वाचं आहे

शिष्य बनवण्यासाठी प्रचार करणं आणि शिकवणं महत्त्वाचं आहे

येशूने आपल्या अनुयायांना आज्ञा दिली की त्यांनी जाऊन शिष्य बनवावं. (मत्त २८:१९) यात प्रचार करणं आणि शिकवणं सामील आहे. आपण सर्वांनीच स्वतःला वेळोवेळी हा प्रश्‍न विचारायला हवा, की ‘शिष्य बनवण्याच्या या दोन पैलूंमध्ये मी सुधारणा कशी करू शकतो?’

प्रचार करणं

लोकांनी आपल्याकडे यावं याची वाट बघत राहण्यापेक्षा आपण “योग्य” जणांना शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. (मत्त १०:११) जेव्हा आपण सेवाकार्यात सहभाग घेतो, तेव्हा ‘जे कोणी भेटतील त्यांच्याशी’ बोलण्याची संधी आपण शोधतो का? (प्रेका १७:१७) प्रेषित पौलने प्रचारकार्यात मेहनत घेतल्यामुळे लुदिया शिष्य बनली.—प्रेका १६:१३-१५.

“सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको” (उप. ११:६)

‘खंड पडू न देता’ प्रचार करा—अनौपचारिक साक्षकार्य व घरोघरचं साक्षकार्य, हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • सॅम्युएल दैनंदिन नित्यक्रमात सत्याचं बी पेरण्याची संधी शोधण्यासाठी मेहनत घेत होता हे त्याने कसं दाखवलं?

  • आपण प्रचाराच्या सर्व प्रकारांमध्ये भाग का घेतला पाहिजे?

  • तुमच्या दैनंदिन नित्यक्रमात तुम्ही कोणाकोणाला राज्याचा संदेश सांगू शकता?

शिकवणं

शिष्य बनवण्यासाठी लोकांना भेटून त्यांना फक्‍त साहित्य देणं पुरेसं नाही. त्यांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करता यावी यासाठी आपण त्यांची पुनर्भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्यासोबत बायबल अभ्यास केला पाहिजे. (१कर ३:६-९) आपण एखाद्याला सत्य शिकवण्यात खूप मेहनत घेत असू, पण तरी हवे तसे परिणाम घडून आले नाही तर काय? (मत्त १३:१९-२२) आपण हार न मानता अशा लोकांचा शोध चालू ठेवला पाहिजे ज्यांचं हृदय चांगल्या जमिनीसारखं आहे.—मत्त १३:२३; प्रेका १३:४८.

“अपुल्लोने पाणी घातले, पण देव वाढवत राहिला” (१ करिंथ. ३:६)

‘खंड पडू न देता’ प्रचार करा—सार्वजनिक साक्षकार्य व शिष्य बनवा, हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • एड्‌विन आणि अॅबीगेल यांच्या हृदयात असलेलं सत्याचं बी रुजण्यासाठी सॉलोमन आणि मेरी यांनी पाणी कसं घातलं?

  • सेवाकार्याच्या सर्व पैलूंमध्ये म्हणजे सार्वजनिक साक्षकार्यातही आपलं काय ध्येयं असलं पाहिजे?

  • इतरांना सत्य शिकवण्यावर आपण जास्त जोर कसा देऊ शकतो?