१-७ एप्रिल
१ करिंथकर ७-९
गीत २६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“अविवाहित असणं—एक देणगी”: (१० मि.)
१कर ७:३२—विवाहामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त असल्यामुळे एक अविवाहित व्यक्ती जास्त लक्ष देऊन यहोवाची सेवा करू शकते (टेहळणी बुरूज११ १/१५ पृ. १८ परि. ३)
१कर ७:३३, ३४—विवाहित ख्रिश्चनांना “जगातल्या गोष्टींबद्दल” चिंता करावी लागते (टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृ. २७ परि. १)
१कर ७:३७, ३८—आध्यात्मिक ध्येयं गाठण्यासाठी जे बंधूभगिनी अविवाहित राहण्याची निवड करतात, ते विवाहित बंधुभगिनींपेक्षा “अधिक चांगले” करतात (टेहळणी बुरूज९६ १०/१५ पृ. १२-१३ परि. १४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
१कर ७:११—एक विवाहित व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आपल्या जोडीदाराशी वेगळं होऊ शकते? (देवाचे प्रेम पृ. २५२ परि. १-पृ. २५३ परि. २)
१कर ७:३६—“ऐन तारुण्याचा काळ” ओसरल्याशिवाय ख्रिश्चनांनी विवाह का करू नये? (टेहळणी बुरूज०० ७/१५ पृ. ३१ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १कर ८:१-१३ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात आणि शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास ४ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१२ ११/१५ पृ. २०—विषय: जे लोक अविवाहित राहण्याची निवड करतात, त्यांना हे दान रहस्यमय रीत्या प्राप्त होतं का? (शिकवणे अभ्यास १२)
ख्रिस्ती जीवन
आपल्या अविवाहित स्थितीचा जास्तीत जास्त फायदा मिळवा: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेले प्रश्नं विचारा: बऱ्याच अविवाहित बंधुभगिनींना कोणत्या आव्हानाला सामोरं जावं लागतं? (१कर ७:३९) इफ्ताहच्या मुलीने कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडलं? एकनिष्ठ असणाऱ्याला यहोवा कोणतं प्रतिफळ देतो? (स्तो ८४:११) मंडळीतले बंधूभगिनी अविवाहित लोकांना कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतात? अविवाहित बंधूभगिनी कोण-कोणत्या प्रकारे यहोवाची सेवा करू शकतात?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १४ परि. ६-१०; चौकट: “आज नियमन मंडळ कसं संघटित आहे?”
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना