अविवाहित असणं—एक देणगी
बऱ्याच वर्षांपासून, ख्रिश्चनांना हे समजून आलं आहे, की अविवाहित असणं खरंतर एक खास देणगी आहे. कारण त्यामुळे एखाद्याला प्रचारकार्यात जास्त सहभाग घेणं, जास्तीत जास्त बंधुभगिनींना मदत करता यावी म्हणून आपला वेळ आणि शक्ती खर्च करणं, आणि यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे ओळख करून घेणं शक्य होतं.
विचार करण्यासाठी: तुम्ही जर अविवाहित आहात तर तुमच्या या परिस्थितीचा तुम्हाला कशा प्रकारे जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल?
मंडळीतले इतर जण अविवाहित लोकांना कशा प्रकारे मदत आणि प्रोत्साहन देऊ शकतात?