व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ करिंथकर १०-१३

यहोवा भरवशालायक आहे

यहोवा भरवशालायक आहे

१०:१३

आपल्या समस्येला काढून टाकणं यहोवासाठी अवघड नाही. पण सहसा आपल्याला ज्या गोष्टींची गरज असते त्या पुरवण्याद्वारे तो या समस्येतून “बाहेर पडण्याचा मार्ग” आपल्यासाठी तयार करतो. यामुळे आपण यशस्वीरीत्या समस्यांचा सामना करू शकतो.

  • तो आपल्याला स्पष्टपणे विचार करायला मदत करू शकतो. तसंच, त्याच्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आणि आध्यात्मिक अन्‍नाद्वारे तो आपल्याला प्रोत्साहन आणि सांत्वन देऊ शकतो.​—मत्त २४:४५; योह १४:१६, तळटीप; रोम १५:४

  • त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आपलं मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशा बायबल अहवालांची आणि तत्त्वांची आपल्याला आठवण होईल. तसंच योग्य निर्णय घेण्यासाठीही आपल्याला मदत होईल.​—योह १४:२६

  • तो आपल्या भल्यासाठी त्याच्या देवदूतांचा वापर करू शकतो.​—इब्री १:१४

  • मंडळीतल्या बंधुभगिनींद्वारे तो आपल्याला मदत करू शकतो.​—कल ४:११