व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

स्मारकविधीसाठी तुम्ही कशी तयारी कराल?

स्मारकविधीसाठी तुम्ही कशी तयारी कराल?

या वर्षापासून ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असेल. कारण या वर्षापासून स्मारकविधीचा दिवस शनिवारी किंवा रविवारी येत असेल, तर जाहीर भाषण आणि टेहळणी बुरूज  अभ्यासाची सभा घेतली जाणार नाही. आणि हे दिवस सोडून जर इतर दिवशी स्मारकविधी येत असेल, तर त्या आठवड्याची जीवन आणि सेवाकार्य सभा घेतली जाणार नाही. मग या वेळेचा तुम्हाला सर्वात चांगला उपयोग करता येईल का? पहिल्या शतकात ज्या प्रकारे या खास समारंभासाठी काही व्यावहारिक योजना करण्यात आल्या, त्याच प्रकारे आपणही करू शकतो. (लूक २२:७-१३; आपली राज्य सेवा ३/१५ पृ. १) या खास प्रसंगासाठी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे, आपली उत्सुकता वाढवली पाहिजे. मग त्यासाठी आपण अजून काय करू शकतो?

  • या समारंभाला उपस्थित राहणं का महत्त्वाचं आहे यावर विचार करा.​—१कर ११:२३-२६

  • यहोवासोबत असणाऱ्‍या तुमच्या नात्याचा प्रार्थनापूर्वक विचार करा.​—१कर ११:२७-२९; २कर १३:५

  • स्मारकविधीबद्दल असणारे लेख वाचा आणि त्यावर मनन करा.​—योह ३:१६; १५:१३

काही प्रचारक शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा  यामध्ये असणाऱ्‍या स्मारकविधीच्या बायबल वाचनाचा भाग वाचून त्यावर मनन करतात. इतरजण सोबत दिलेल्या तक्त्यातल्या बायबल अहवालांचं वाचन करतात. तर काही जण टेहळणी बुरूज  मासिकात स्मारकविधीबद्दल आणि यहोवाने व येशूने दाखवलेल्या प्रेमाबद्दल सांगणाऱ्‍या लेखांची उजळणी करतात. यांपैकी कोणताही पर्याय तुम्ही वापरू शकता. पण यामुळे यहोवाशी आणि त्याच्या पुत्राशी असलेलं तुमचं नातं घनिष्ठ होवो, हीच इच्छा!