तुम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहात का?
यहोवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण राज्याच्या कार्यांना जीवनात पहिलं स्थान देण्यासाठी झटत राहिलं पाहिजे. (१कर ९:२६, २७) आपण आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या पूर्ण करताना वृद्ध याकोबसारखी मनोवृत्ती दाखवली पाहिजे. आपल्याला यहोवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर आपण . . .
-
मंडळीच्या सभांची चांगली तयारी केली पाहिजे
-
सेवाकार्यात नियमितपणे सहभाग घेतला पाहिजे
-
मंडळीतल्या भाऊबहिणींना मदत करण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे
तुमची परिस्थिती कितीही कठीण असली, तरी सतत प्रार्थना करून यहोवाला मदत मागत राहा. तसंच, त्याची सेवा करण्यासाठी तुम्ही मनापासून जे प्रयत्न करत आहात, त्यांवर त्याचा आशीर्वाद मागा.
स्वतःला विचारा: ‘यहोवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मला माझ्या जीवनाच्या कोणत्या पैलूंमध्ये आणखी जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे?’