व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?

माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?

याकोबने एका खूप महत्त्वाच्या गोष्टीसाठी, म्हणजे यहोवाच्या आशीर्वादासाठी एका देवदूताशी कुस्ती केली. (उत्प ३२:२४-३१; होशे १२:३, ४) मग आपल्याबद्दल काय? यहोवाच्या आज्ञांप्रमाणे वागण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपणही मनापासून प्रयत्न करायला तयार आहोत का? उदाहरणार्थ, सभेला जायचं की नोकरीच्या ठिकाणी ओव्हरटाइम करायचं यांपैकी एक निवडायचं असेल, तर आपण काय निवडू? आपला वेळ, शक्‍ती आणि साधनसंपत्ती यांतलं सगळ्यात चांगलं ते आपण यहोवाला दिलं, तर तो “जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद” आपल्याला देईल. (मला ३:१०) तो आपल्याला मार्गदर्शन देईल, आपलं संरक्षण करेल आणि आपल्या गरजाही पुरवेल.—मत्त ६:३३; इब्री १३:५.

आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बहिणीची तिच्या आवडत्या कामामुळे कशा प्रकारे परीक्षा झाली?

  • आपल्या कामामुळे कशा प्रकारे आपली परीक्षा होऊ शकते?

  • तीमथ्यने आध्यात्मिक रीत्या चांगली प्रगती केलेली असूनही त्याने स्वतःसमोर आणखी आध्यात्मिक ध्येयं ठेवणं गरजेचं का होतं?—१ती ४:१६

  • तुमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?

    आपल्यासाठी “सगळ्यात महत्त्वाचं काम” कोणतं आहे, हे आपण कसं दाखवू शकतो?