ख्रस्ती जीवन
‘परके देव फेकून द्या’
याकोबच्या काळात, खरंतर यहोवाने मूर्तिपूजा न करण्याबद्दलचा नियम अजून दिलेला नव्हता. तरीसुद्धा याकोबला माहीत होतं, की आपण फक्त यहोवाचीच उपासना केली पाहिजे. (निर्ग २०:३-५) म्हणून जेव्हा, यहोवाने याकोबला बेथेलला परत जायला सांगितलं, तेव्हा त्याने त्याच्यासोबत असलेल्या सगळ्यांना आपापल्या मूर्ती टाकून द्यायला सांगितलं. मग त्याने त्या सगळ्या मूर्ती, तसंच कानातली कुंडले जमिनीत पुरून टाकली. कदाचित ही कुंडले दुष्ट शक्तीपासून रक्षण व्हावं म्हणून घातली जात असावीत. (उत्प ३५:१-४) याकोबने जे केलं, त्यामुळे यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल.
आज आपल्या काळातसुद्धा, आपण फक्त यहोवाचीच उपासना कशी करू शकतो? सगळ्यात आधी, आपण मूर्तिपूजा किंवा भूतविद्येशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. जसं की, जादूटोण्याशी संबंधित असलेल्या वस्तू आपल्याजवळ असतील तर त्या फेकून दिल्या पाहिजेत. तसंच, आपण कोणत्या गोष्टींनी स्वतःची करमणूक करतो, याचाही आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, स्वतःला विचारा: ‘भूतप्रेत, जादूटोणा किंवा अनैसर्गिक शक्तींबद्दल असलेली पुस्तकं किंवा चित्रपट मला आवडतात का? मी करमणुकीसाठी ज्या गोष्टी वाचतो किंवा पाहतो त्यांत जादूटोणा, मंत्रतंत्र यांसारख्या गोष्टी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वापरल्या जातात का?’ यहोवाला ज्या गोष्टींची घृणा वाटते त्यांपासून आपण दूर राहिलं पाहिजे.—स्तो ९७:१०.
“सैतानाचा विरोध करा” हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
बायबल अभ्यास करणाऱ्या पलेसा नावाच्या एक स्त्रीच्या जीवनात कोणती समस्या आली?
-
भूतविद्येशी संबंधित असलेल्या समस्यांच्या बाबतीत मंडळीतल्या वडिलांची मदत घेणं का चांगलं आहे?
-
यहोवाचं संरक्षण हवं असेल, तर आपण कोणत्या गोष्टींशी पूर्णपणे संबंध तोडून टाकला पाहिजे?
-
पलेसाने कोणतं पाऊल उचललं?
-
तुम्ही राहता त्या ठिकाणी दुरात्म्यांच्या प्रभावापासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे?