व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

चांगली उत्तरं कशी द्यावी

चांगली उत्तरं कशी द्यावी

चांगल्या उत्तरांमुळे मंडळीला उभारणी मिळते. (रोम १४:१९) उत्तर देणाऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो. (नीति १५:२३, २८) त्यामुळे आपण प्रत्येक सभेत एकतरी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण प्रत्येक वेळी हात वर केल्यावर आपल्याला उत्तर द्यायची संधी मिळेलच असं नाही. त्यामुळे आपण एक-दोन नाही तर जास्त उत्तरं तयार केली पाहिजेत.

चांगलं उत्तर . . .

  • सोपं, स्पष्ट आणि संक्षिप्त असतं. बऱ्याचदा ते ३० सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात देता येतं

  • स्वतःच्या शब्दात दिलं जातं

  • देताना आधीच्या उत्तरातील मुद्दे पुन्हा सांगायचे नसतात

जर तुम्हाला उत्तर द्यायची पहिली संधी मिळाली तर . . .

  • सरळ, सोपं आणि प्रश्‍नाचं थेट उत्तर द्या

प्रश्‍नाचं थेट उत्तर आल्यावर, तुम्ही . . .

  • परिच्छेदातील एखादं शास्त्रवचन मुद्द्‌याशी कसं निगडित आहे त्यावर टिप्पणी करू शकता

  • तो विषय आपल्या जीवनाशी कसा संबंधित आहे ते सांगू शकता

  • दिलेली माहिती आपण कशी लागू करू शकतो ते सांगू शकता

  • दिलेल्या माहितीशी निगडित असलेला एखादा अनुभव थोडक्यात सांगू शकता