व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नीतिसूत्रे १२-१६

ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे

ज्ञानप्राप्ती सोन्यापेक्षा उत्तम आहे

देवाकडून मिळणारं मार्गदर्शन एवढं मौल्यवान का आहे? कारण त्यामुळे लोकांना वाईट मार्गापासून फिरण्यासाठी मदत होते आणि त्यांचा जीव वाचतो. ज्ञान मिळाल्यामुळे त्यांच्या विचारांवर, बोलीवर, आणि कार्यांवर सकारात्मक परिणाम होतो.

ज्ञानप्राप्तीमुळे आपण गर्वापासून लांब राहतो

१६:१८,१९

  • सर्व प्रकारचं ज्ञान यहोवाकडून येतं या गोष्टीची जाणीव सुज्ञ व्यक्तीला असते

  • जे जीवनात यशस्वी आहेत किंवा ज्यांना जास्त जबाबदाऱ्या दिल्या जातात, खासकरून त्यांनी गर्व आणि अहंकार यांपासून सावध राहिलं पाहिजे

ज्ञानप्राप्तीमुळे आपली बोली प्रोत्साहनदायक होते

१६:२१-२४

  • एक सुज्ञ व्यक्ती समजबुद्धीचा वापर करून इतरांमध्ये असलेले चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्याबद्दल चांगलं बोलते

  • सुज्ञ व्यक्तीचे शब्द कठोर किंवा दुखवणारे नसतात, तर ते मधासारखे गोड आणि प्रोत्साहन देणारे असतात