नमुना सादरीकरणं
देवाचे राज्य काय आहे? (T-36 पत्रिका)
प्रश्न: दिवसेंदिवस वाईट होत चाललेल्या परिस्थितीबद्दल शास्त्रात आधीच सांगितलं होतं, हे तुम्हाला माहीत आहे का?
वचन: मत्त २४:७
सादरता: भविष्यात ही परिस्थिती कशी सुधारेल याबद्दल या पत्रिकेत सांगितलं आहे.
सत्य शिकवा
सत्य: मनुष्य मरतो तेव्हा त्याचं अस्तित्व संपतं. त्यामुळे मृत्यूनंतर आपलं काहीतरी होईल अशी भीती बाळगायची काहीच गरज नाही. येशूने मृत्यूची तुलना झोपेशी केली. त्याने लाजरला जसं मृत्यूतून पुन्हा उठवलं तसंच तो आपल्या मृत प्रिय जणांनाही “उठवेल.” त्यानंतर ते पुन्हा या पृथ्वीवर आनंदाने जगू शकतील.—ईयो १४:१४.
मंडळीच्या सभेची आमंत्रणपत्रिका (inv-MR)
सादरता: [जर घरमालकाने बायबलमधील संदेशाप्रती आवड दाखवली तर तुम्ही असं म्हणू शकता] मी तुम्हाला एका शास्त्रावर आधारित भाषणासाठी आमंत्रित करू इच्छितो. हे भाषण यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात दिलं जाईल आणि यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही. [सभेची आमंत्रणपत्रिका द्या. मग त्यावर आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेची वेळ आणि ठिकाण दाखवा. तसंच, जाहीर भाषणाचा विषय सांगा.]
प्रश्न: तुम्ही कधी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेला होता का? [घरमालकाची परवानगी असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा व्हिडिओ दाखवा]
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.