“तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको”
यहोवाचे स्तर आपलं संरक्षण करू शकतात. पण त्यासाठी हे गरजेचं आहे की आपण त्यांना मौल्यवान लेखून नेहमी आपल्या मनात ठेवलं पाहिजे. (नीति ७:३) यहोवाचा सेवक जेव्हा या स्तरांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो सैतानाच्या भुलवणाऱ्या आणि फसव्या युक्त्यांना बळी पडू शकतो. नीतिसूत्रे अध्याय ७ मध्ये अशा एका तरुणाबद्दल सांगितलं आहे ज्याने यहोवाच्या स्तरांपासून आपलं मन वळवलं. त्याने केलेल्या चुकांवरून आपल्याला सावध राहायला कशी मदत मिळते?
-
आपल्या पाच ज्ञानेंद्रियांना आकर्षक वाटतील अशा गोष्टींचा वापर करून सैतान आपल्याला पाप करण्यास प्रवृत्त करतो. अशा प्रकारे तो आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो
-
आपल्या आध्यात्मिकतेला धोका ठरतील अशा वाईट कृत्यांच्या दुष्परिणामांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी बुद्धी आणि समज आपल्याला मदत करेल