२४-३० ऑक्टोबर
नीतिसूत्रे १७-२१
गीत ३९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा”: (१० मि.)
नीति १९:११—आपल्याला कुणी दुखावलं असेल तर रागावण्याऐवजी शांत राहा (टेहळणी बुरूज१५ १/१ पृ. १२-१३)
नीति १८:१३, १७; २१:१३—घडलेल्या प्रसंगामागचं कारण जाणून घ्या (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. २९-३० परि. ११-१४)
नीति १७:९—प्रेम असल्यामुळे इतरांना क्षमा करा (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ३१ परि. १७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नीति १७:५—आपण मनोरंजन सुज्ञपणे का निवडावं याचं एक कारण काय आहे? (टेहळणी बुरूज१० ११/१५ पृ. ६ परि. १७; टे.बु.१० ११/१५ पृ. ३१ परि. १५)
नीति २०:२५—या वचनात दिलेलं तत्त्व लग्नाआधीच्या गाठीभेटी आणि विवाह यात कसं लागू होतं? (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. १५-१६ परि. १२-१३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति १८:१४–१९:१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) मंडळीच्या सभेची आमंत्रणपत्रिका द्या.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) सभेची आमंत्रणपत्रिका —चर्चेच्या शेवटी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? या व्हिडिओबद्दल सांगा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. ६५ परि. १४-१५—विद्यार्थ्याला सभेला येताना पेहराव आणि केशभूषा यांमध्ये सुधारणा करण्याची गरज का आहे, हे समजावून सांगा.
ख्रिस्ती जीवन
शांती प्रस्थापित केल्याने आशीर्वाद मिळतात: (१५ मि.) चर्चा. जानेवारी २०१५ च्या JW ब्रॉडकास्टमधील शांती प्रस्थापित केल्याने आशीर्वाद मिळतात हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्न विचारा: जेव्हा मतभेद होतात तेव्हा आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? नीतिसूत्रे १७:९ आणि मत्तय ५:२३, २४ या वचनांतील तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळतात?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ७ परि. १५-२७ पृ. ७६ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना