“मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे”
नीतिसूत्रे या पुस्तकात पालकांसाठी चांगले सल्ले दिले आहेत. रोपट्याला आधार दिल्यामुळे त्याची वाढ चांगली होते आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या झाडात होतं. त्याच प्रकारे मुलांना लहानपणीच प्रशिक्षण दिलं तर ती मोठी झाल्यावर आनंदाने यहोवाची सेवा करतील.
-
मुलांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी बराच वेळ खर्च करण्याची आणि मेहनत घेण्याची गरज आहे
-
पालकांनी स्वतः एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. त्यांनी मुलांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तसंच, त्यांनी मुलांची चूक सुधारून त्यांना शिस्तही लावली पाहिजे
-
शिस्त लावणे हे प्रेमळ प्रशिक्षणासारखं आहे ज्यामुळे मुलांची विचारसरणी सुधारते
-
सर्व मुलं सारखी नसतात त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिस्त लावण्याची गरज पडू शकते