३-९ ऑक्टोबर
नीतिसूत्रे १-६
गीत ३७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव”: (१० मि.)
[नीतिसूत्रे पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
नीति ३:१-४—एकनिष्ठ प्रीती आणि विश्वासूपणा दाखवा (टेहळणी बुरूज०० १/१५ पृ. २३-२४)
नीति ३:५-८—यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्यास शिका (टेहळणी बुरूज०० १/१५ पृ. २४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
नीति १:७—यहोवाचे भय बुद्धीचा किंवा “ज्ञानाचा प्रारंभ” आहे असं का म्हणण्यात आलं आहे? (टेहळणी बुरूज०६ १०/१ पृ. ३, परि. ५; इन्साईट-२ पृ. १८०)
नीति ६:१-५—व्यवसायासंबंधी अविचारीपणे करार केल्यास कोणती योग्य पावलं उचलावी? (टेहळणी बुरूज०० ९/१५ पृ. २५-२६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति ६:२०-३५
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सभेचं आमंत्रण देण्यासाठी जगभरात जी मोहीम चालवली जाईल, त्यात जास्तीत-जास्त सहभाग घेण्याचं प्रोत्साहन प्रचारकांना द्या.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा (८ मि.)
आपल्या सभेला येणाऱ्यांना प्रेम दाखवा (नीति ३:२७): (७ मि.) चर्चा. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर विचारा: फक्त ऑक्टोबर महिन्यातच नव्हे तर नेहमीच आपण आपल्या सभागृहात मैत्रीपूर्ण वातावरण टिकवून ठेवण्यासाठी काय करू शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ६ परि. १-१४
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३८ आणि प्रार्थना