“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव”
यहोवावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. त्याच्या नावाचा जो अर्थ होतो त्यावर मनन केल्यामुळे आपला भरवसा वाढतो की त्याने दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याच्यावर आपला भरवसा वाढवत राहण्यासाठी प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे. नीतिसूत्रे अध्याय ३ आपल्याला या गोष्टीची हमी देतं की यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो आणि त्यांचा ‘मार्गदर्शक’ बनतो.
जो आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो . . .
-
तो निर्णय घेण्याआधी यहोवाकडे मार्गदर्शन मागत नाही
-
तो स्वतःच्या बुद्धीवर किंवा जगातील लोकांच्या बुद्धीवर भरवसा ठेवतो
जो यहोवावर भरवसा ठेवतो . . .
-
तो वैयक्तिक बायबल अभ्यास, मनन आणि प्रार्थना यांद्वारे त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडतो
-
तो कोणताही निर्णय घेण्याआधी बायबल तत्त्वांचं परीक्षण करतो आणि याद्वारे तो मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहतो
आधी: जे मला सर्वात जास्त योग्य वाटतं तेच मी निवडतो |
आधी: यहोवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी मी प्रार्थना आणि वैयक्तिक अभ्यास करतो |
त्यानंतर: यहोवाकडे प्रार्थना करतो की मी घेतलेल्या निर्णयावर त्याने आशीर्वाद द्यावा |
त्यानंतर: बायबल तत्त्वांनुसार जे योग्य आहे त्यानुसार मी निर्णय घेतो |