व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—स्वार्थ पाहू नका व चिडू नका

प्रेम खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे—स्वार्थ पाहू नका व चिडू नका

हे का महत्त्वाचं: येशूने शिकवलं की प्रेम हे त्याच्या शिष्यांचं ओळखचिन्ह असेल. (योह १३:३४, ३५) ख्रिस्तासारखं प्रेम दाखवण्यासाठी आपण दुसऱ्‍यांच्या हिताची चिंता केली पाहिजे आणि चिडणं टाळलं पाहिजे.—१कर १३:५.

हे कसं करावं:

  • जेव्हा कोणी काही बोलण्याद्वारे किंवा कार्यांद्वारे आपल्याला दुखवतं, तेव्हा आपण थोडं थांबून समस्येच्या कारणाबद्दल आणि आपण देणार असलेल्या प्रतिक्रियेच्या परिणामांबद्दल विचार केला पाहिजे.—नीत १९:११

  • हे नेहमी लक्षात असू द्या की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत आणि कधीकधी आपणही असं काहीतरी बोलून जातो किंवा करतो ज्याचा आपल्याला नंतर पस्तावा होतो

  • मतभेद लवकरात लवकर सोडवा

‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्यास्वार्थ पाहू नका व चिडू नका हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • हॅरीने दिलेल्या सल्ल्याप्रती बेंजामिनने कशी प्रतिक्रिया दिली?

  • कोणत्या गोष्टीने हॅरीला चीड येण्यापासून रोखलं?

  • हॅरीने शांतपणे उत्तर दिल्यामुळे काय झालं?

आपल्याला एखाद्याने चीड आणल्यावर शांत राहिल्यामुळे मंडळीला कसा फायदा होतो?