व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम ३३-३४

यहोवाचे आकर्षक गुण

यहोवाचे आकर्षक गुण

३४:५-७

मोशेला यहोवाचे गुण चागंल्या प्रकारे माहित असल्यामुळे तो इस्राएली लोकांसोबत वागताना धीर दाखवू शकला. आपणही यहोवाच्या गुणांबद्दल खोलवर माहिती घेतली, तर आपल्या भाऊबहिणींशी आपल्याला दयाळूपणे वागता येईल.

  • “दयाळू व कृपाळू”: प्रेमळ आईवडील जशी आपल्या मुलांची काळजी घेतात तसंच, यहोवाही आपल्या उपासकांवर प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो.

  • “मंदक्रोध”: यहोवा त्याच्या सेवकांसोबत धीराने वागतो. तो त्यांच्या चुकांसाठी त्यांना लगेच शिक्षा करत नाही तर त्या सुधारण्यासाठी त्यांना वेळ देतो.

  • ‘दयेचा सागर’: यहोवाचं त्याच्या लोकांवर एकनिष्ठ प्रेम आहे आणि त्याचं हे प्रेम कधीच कमी होत नाही.

स्वतःला विचारा, ‘मी दया आणि कृपा या यहोवाच्या गुणांचं अनुकरण कसं करू शकतो?’