१९-२५ ऑक्टोबर
निर्गम ३५-३६
गीत १३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाचं काम करण्यासाठी समर्थ”: (१० मि.)
निर्ग ३५:२५, २६—इस्राएली लोकांनी मनापासून जे दान दिलं त्यासाठी यहोवाने त्यांना आशीर्वाद दिला (टेहळणी बुरूज१४ १२/१५ पृ. ४ परि. ४)
निर्ग ३५:३०-३५—बसालेल आणि अहलियाब यांना यहोवाच्या पवित्र आत्म्याने “सर्व तऱ्हेचे” काम करण्यासाठी समर्थ बनवलं (टेहळणी बुरूज११ १२/१५ पृ. १९ परि. ६)
निर्ग ३६:१, २—त्यांनी केलेल्या कामाचं सर्व श्रेय यहोवाला मिळणं हे योग्यच होतं (टेहळणी बुरूज११ १२/१५ पृ. १९ परि. ७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग ३५:१-३—शब्बाथाच्या नियमावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०५ ६/१ पृ. १५ परि. १४)
निर्ग ३५:२१—उदारतेने दान देण्याच्या बाबतीत इस्राएली लोकांनी आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण कसं मांडलं? (टेहळणी बुरूज०० ११/१ पृ. २९ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३५:१-२४ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी): चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग घरमालकाला आपल्या वेबसाईटबदद्ल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ४)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. २ परि. १८-२० (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
२०१८ चा प्रकाशन समितीचा अहवाल: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. मग श्रोत्यांना विचारा: प्रकाशनं छापण्याच्या बाबतीत संघटनेने कोणते बदल केले आहेत आणि का? प्रकाशनांची छपाई कमी करण्यात आल्यामुळे कोणते फायदे झाले आहेत? भाषांतराचं काम इतकं महत्त्वाचं का आहे आणि मागच्या काही वर्षांत आपल्याला कोणती वाढ बघायला मिळाली आहे? डिजिटल स्वरूपात प्रकाशनं तयार केल्यामुळे आणि व्हिडिओ निर्मितीमुळे कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या! पाठ ९८-१००
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत १८ आणि प्रार्थना