व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

देवाच्या राज्याला जाहीर करा! नोव्हेंबर महिन्यात एक खास मोहीम

देवाच्या राज्याला जाहीर करा! नोव्हेंबर महिन्यात एक खास मोहीम

येशूने लोकांना देवाच्या “राज्याचा आनंदाचा संदेश” सांगितला. (लूक ४:४३) त्याने लोकांना त्या राज्यासाठी प्रार्थना करायलाही शिकवलं. (मत्त ६:९, १०) नोव्हेंबर महिन्यादरम्यान आपण देवाच्या राज्याला जाहीर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. (मत्त २४:१४) या मोहिमेत आवेशाने भाग घेण्यासाठी आपल्या वेळेचं नियोजन करा. या महिन्यात सहायक पायनियरिंग करणारे भाऊबहीण ३० किंवा ५० तास करू शकतात.

तुमच्या क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याबद्दल एखादं वचन वाचून दाखवा. लोकांच्या धार्मिक विश्‍वासाला लक्षात ठेवून त्यांना कोणतं वचन दाखवणं योग्य असेल हे ठरवा. पहिल्या भेटीतच एखाद्या व्यक्‍तीने आवड दाखवली तर तिला टेहळणी बुरूज  सार्वजनिक आवृत्ती क्र. २, २०२० ची एक प्रत द्या. त्या व्यक्‍तीची लवकरात लवकर पुनर्भेट घ्या आणि शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन देऊन तिचा बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. लवकरच देवाचं राज्य त्याच्या विरोधात असलेल्या सरकारांचा नाश करेल. (दान २:४४; १कर १५:२४, २५) तर मग, आपण या मोहिमेत पूर्णपणे भाग घेऊ या आणि हे दाखवू या की आपण देवाच्या राज्याला एकनिष्ठ आहोत!

देवाचं राज्य या पृथ्वीला सुंदर बनवेल!