नमुना सादरीकरणं
मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पान १)
प्रश्न: नमस्ते बोलल्यानंतर म्हणा, “आज ही पत्रिका आम्ही सर्वांना देत आहोत. बहुतेक लोकांच्या मनात येणाऱ्या एका प्रश्नाबद्दल यामध्ये चर्चा केली गेली आहे. ही तुमच्यासाठी आहे.” मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? ही पत्रिका घरमालकाला द्या. पत्रिकेवरील शीर्षक दाखवा आणि असं म्हणा, “हा खरोखरी आपल्याला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. नाही का? तुम्ही याचं उत्तर काय द्याल? हो? नाही? माहीत नाही?”
सादरता: या पत्रिकेतील माहिती शास्त्रवचनांवर आधारित आहे. यामुळे शास्त्रवचनांत काय सांगितलं आहे हे तुम्हाला कळेल.
वचन: १ करिंथकर १५:२६
मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पान २)
प्रश्न: आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपले प्रियजन मृत्यूमुळे गमावले आहेत. आपल्याला त्यांना परत पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं का?
सादरता: या वचनातील माहिती तुमच्यासाठी कशी फायद्याची ठरू शकते हे या पत्रिकेत समजावलं आहे.
देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा!
प्रश्न: आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा आपले मित्र, सर्वांनाच नाव आहे. मग देवालासुद्धा एक नाव आहे का? तुम्हाला काय वाटतं?
वचन: स्तोत्र ८३:१८, तळटीप
सादरता: बायबलमध्ये देवाविषयी आणखी बरीच माहिती दिली आहे. त्याबद्दल या माहितीपत्रकात समजावलं आहे. [पान ६ आणि ७ वर त्यांचे लक्ष वेधा.]
स्वतःचं सादरीकरण तयार करा
वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.