ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—बायबल विद्यार्थ्याला समर्पण करण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत करा
हे का महत्त्वाचं: यहोवाची पसंती मिळवण्यासाठी बायबल विद्यार्थाने आपलं जीवन त्याला समर्पण करून बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. (१ पेत्र ३:२१) जे आपल्या समर्पणाला अनुसरून जीवन जगतात त्यांना आध्यात्मिक सुरक्षा मिळते. (स्तो ९१:१, २) एक ख्रिस्ती आपलं जीवन कुठल्या व्यक्तीला, कामाला, किंवा संघटनेला नव्हे तर यहोवाला समर्पित करतो. तेव्हा बायबल विद्यार्थ्यांनी देवासाठी प्रेम आणि कदर वाढवली पाहिजे.—रोम १४:७, ८.
हे कसं करावं:
-
बायबल अभ्यास करतेवेळी दिलेली माहिती यहोवाबद्दल काय शिकवते यावर चर्चा करा. रोज बायबलचं वाचन करण्यावर आणि यहोवाला “निरंतर” प्रार्थना करण्यावर जोर द्या.—१थेस्स ५:१७; याको ४:८.
-
समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याचं आध्यात्मिक ध्येय ठेवण्यासाठी, बायबल विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या. तसंच, त्याआधी छोटी-छोटी ध्येयं साध्य करण्यासाठी त्याची मदत करा. जसं की, सभांमध्ये उत्तरं देणं किंवा शेजाऱ्यांना अथवा कामावरील सोबत्यांना प्रचार करणं. समर्पण हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय असतो. यहोवा कोणावरही त्याची सेवा करण्याचा दबाव टाकत नाही.—अनु ३०:१९, २०
-
यहोवाला खूश करण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरण्यासाठी, बायबल विद्यार्थ्याने जीवनात आवश्यक ते फेरबदल करावे यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. (नीति २७:११) काही सवयी आणि गुण अगदी खोलवर रुजलेले असल्यामुळे बायबल विद्यार्थ्याला जुन्या मनुष्यास काढून टाकून नवा मनुष्य धारण करण्यास तुम्हाला सतत मदत करावी लागेल. (इफि ४:२२-२४) टेहळणी बुरूज पत्रिकेतून “बायबलनं बदललं जीवन!” या लेखमालीकेतील लेखांबद्दल त्याच्याशी चर्चा करा.
-
यहोवाच्या सेवेत तुम्हाला जो आनंद अनुभवायला मिळाला त्याबद्दल त्याला सांगा.—यश ४८:१७, १८