व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ८७-९१

सर्वसमर्थाच्या गुप्त स्थली वस्ती करा

सर्वसमर्थाच्या गुप्त स्थली वस्ती करा

आज आपल्याला यहोवाच्या “गुप्त स्थली” आध्यात्मिक रीत्या संरक्षण मिळतं

९१:१, २, ९-१४

  • या गुप्त स्थळी राहण्यासाठी आपण समर्पण करणं आणि बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे

  • ज्या लोकांना देवावर भरवसा नाही त्यांना या स्थळाबद्दल माहीत नाही

  • जे या गुप्त स्थळी राहतात, ते कुठल्याही व्यक्तीमुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे देवावरील आपलं प्रेम व विश्वास कमी होऊ देत नाही

‘पारधी’ आपल्याला पाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो

९१:३

  • पक्षी खूप सावध असतात आणि त्यांना जाळ्यात पकडणं सोपं नसतं

  • पारधी पक्ष्यांच्या सवयींचं नीट निरीक्षण करतो आणि त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतो

  • सैतानसुद्धा ‘पारध्याप्रमाणे’ यहोवाच्या लोकांचं निरीक्षण करतो आणि त्यांची आध्यात्मिक हानी करण्यासाठी धूर्तपणे फासे रचतो

सैतान वापरत असलेले चार घातक फासे:

  • मनुष्याचे भय

  • भौतिकवाद

  • हानिकारक मनोरंजन

  • आपसांतील मतभेद