ख्रिस्ती जीवन
सत्य शिकवा
येत्या सप्टेंबर महिन्यापासून जीवन आणि सेवाकार्य सभा कार्यपुस्तिका यामध्ये, “सत्य शिकवा” या नवीन नमुना सादरीकरणाचा समावेश असेल. एखादा प्रश्न आणि त्याच्याशी निगडित शास्त्रवचन वापरून, लोकांना बायबलमधील मूलभूत सत्य सांगणं हा आपला उद्देश असेल.
जर तुम्हाला वाटलं की घरमालक आवड दाखवत आहे, तर तुम्ही पुढील भेटीची उत्सुकता वाढवण्यासाठी एखादी पत्रिका किंवा प्रकाशन देऊ शकता किंवा jw.org वरून व्हिडिओ दाखवू शकता. चर्चा पुढे वाढवण्यासाठी काही दिवसातच त्यांची पुनर्भेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही नवीन सादरीकरणं आणि त्यावर आधारित विद्यार्थी भाग बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या पुस्तकातील धड्यांच्या सारांशांवर आधारित असतील. फक्त बायबलचा वापर करून पुनर्भेट करण्यासाठी आणि बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपल्याला आणखी प्रशनं आणि वचनं या सारांशांमध्ये मिळतील.
जीवनाकडे जाणारा एकच मार्ग आहे. (मत्त ७:१३, १४) आपण वेगवेगळ्या धर्मातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांशी बोलतो. त्यामुळे त्यांना वैयक्तिक रीत्या आकर्षक वाटतील अशा बायबल सत्यांबद्दल आपण बोललं पाहिजे. (१तीम २:४) जसजसं आपण वेगवेगळ्या बायबल विषयांशी परिचित होऊ आणि “सत्याचे वचन नीट” सांगण्यात आणखी कुशल होऊ, तसतसं आपल्याला दुसऱ्यांना सत्य शिकवण्यात यश मिळेल आणि आपला आनंददेखील वाढेल.—२तीम २:१५.