व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

येशू आपल्या बंधुभगिनींसाठीही मरण पावला

येशू आपल्या बंधुभगिनींसाठीही मरण पावला

येशूने अपरिपूर्ण मानवांसाठी आपलं जीवन दिलं. (रोम ५:८) येशूने ‘माझ्यासाठी’ आपलं जीवन दिलं आणि प्रेम दाखवलं या गोष्टीची आपल्याला नक्कीच कदर असेल. पण येशूने फक्‍त आपल्या एकट्यासाठीच नाही तर आपल्या बंधुभगिनींसाठीही आपला प्राण दिला याचीदेखील आपण स्वतःला आठवण करून दिली पाहिजे. आपल्यासारखेच अपरिपूर्ण असलेल्या बंधुभगिनींना आपण येशूप्रमाणे कसं प्रेम दाखवू शकतो? असं करण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला, आपण अशा बंधुभगिनींशीही मैत्री करू शकतो ज्यांची पार्श्‍वभूमी वेगळी आहे. (रोम १५:७; २कर ६:१२, १३) दुसरा, इतर जण दुखावतील असं वागण्या-बोलण्याचं आपण टाळू शकतो. (रोम १४:१३-१५) शेवटचा, जर कोणी आपल्याला दुखावलं तर लगेच त्याला क्षमा करायला आपण तयार राहू शकतो. (लूक १७:३, ४; २३:३४) जर आपण या तीन मार्गांनी येशूचं अनुकरण करण्यात मेहनत घेतली तर यहोवा मंडळीत शांती आणि ऐक्य टिकून ठेवण्यासाठी मदत करेल.

व्यक्‍तिमत्त्वाचं सौंदर्य वाढवा! हा व्हिडिओ पाहा आणि नंतर पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • सुरुवातीला मीकीला तिच्या मंडळीबद्दल कसं वाटलं?

  • कोणत्या गोष्टीमुळे तिच्या भावना बदलल्या?

  • येशूच्या उदाहरणामुळे मीकीला तिच्या दृष्टिकोनात सुधार करायला कशी मदत झाली? (मार्क १४:३८)

  • बंधुभगिनींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला नीतिसूत्रे १९:११ आपल्याला कशी मदत करतं?