‘प्रत्येक शहरात वडिलांची नियुक्ती करण्याची’ जबाबदारी तीतवर सोपवण्यात आली होती. आजसुद्धा जेव्हा विभागीय पर्यवेक्षक, मंडळ्यांमध्ये बांधवांना नियुक्त करण्याचं काम करतात, तेव्हा ते बायबलमध्ये दिलेल्या याच नमुन्याचं पालन करत असतात.
नियमन मंडळ
पहिल्या शतकाप्रमाणेच, आजसुद्धा नियमन मंडळाने वडील आणि सहायक सेवकांना नियुक्त करण्याची गंभीर जबाबदारी विभागीय पर्यवेक्षकांवर सोपवली आहे.
विभागीय पर्यवेक्षक
विभागीय पर्यवेक्षकांनी, मंडळीच्या वडील वर्गाने केलेल्या शिफारशींवर काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर, पात्र असणाऱ्या बांधवांना नियुक्त केलं पाहिजे.
नियुक्त केलेले वडील
वडील म्हणून नियुक्त केल्यानंतरसुद्धा बांधवांनी शास्त्रवचनानुसार असलेल्या पात्रता टिकवून ठेवल्या पाहिजेत.