ख्रिस्ती जीवन
कधीही विसरली जाणार नाहीत अशी चांगली कार्यं!
देवाच्या पवित्र सेवेत चांगली कामं करण्याद्वारे, आपण सर्व जण एक चांगलं नाव कमावू शकतो. ज्याप्रमाणे मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टी प्रेमळ आईवडील कधीही विसरत नाहीत, त्याचप्रमाणे यहोवाच्या नावासाठी आपण दाखवलेलं प्रेम आणि केलेली कार्यं तोही कधी विसरत नाही. (मत्त ६:२०; इब्री ६:१०) हे खरं आहे, की आपल्या क्षमता आणि परिस्थिती वेगवेगळया असू शकतात, पण तरीही जेव्हा यहोवाच्या सेवेत आपण होताहोईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होतो. (गल ६:४; कल ३:२३) अनेक वर्षांपासून हजारो बंधुभगिनी बेथेल सेवेत कार्य करत आहेत. तुम्हालाही बेथेलमध्ये सेवा करणं शक्य आहे का? जर नसेल, तर तुम्ही इतरांना बेथेल सेवेसाठी प्रोत्साहन देऊ शकता का? किंवा बेथेलमध्ये सेवा करणाऱ्या एका बांधवाला किंवा बहिणीला या खास सेवेत टिकून राहण्यासाठी मदत करू शकता का?
तुम्ही बेथेल सेवेसाठी तयार आहात का? हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
बेथेल सेवा करण्यामागचा हेतू काय असला पाहिजे?
-
बेथेलमध्ये सेवा केलेल्या काही बंधुभगिनींच्या काय भावना आहेत?
-
बेथेल सेवेसाठी कोणत्या पात्रता असणं गरजेचं आहे?
-
बेथेल सेवेसाठी अर्ज करण्याकरता तुम्ही काय करू शकता?