ख्रिस्ती जीवन
यहोवावर प्रेम करणाऱ्यांसोबत वेळ घालवा
यहोवावर प्रेम करणाऱ्यांसोबत आपण वेळ का घालवला पाहिजे? कारण आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांचा आपल्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. (नीत १३:२०) उदाहरणार्थ, राजा योवाश जोपर्यंत महायाजक यहोयादासोबत होता, तोपर्यंत त्याने “परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट” ते केलं. (२इत २४:२) पण यहोयादाच्या मृत्यूनंतर, वाईट संगतीमुळे योवाश राजा यहोवापासून दूर गेला.—२इत २४:१७-१९.
पहिल्या शतकात, पौलने ख्रिस्ती मंडळीची तुलना एका ‘मोठ्या घरासोबत’ केली आणि मंडळीतल्या सदस्यांची तुलना घरात वापरल्या जाणाऱ्या ‘भांड्यांशी’ केली. जेव्हा आपण यहोवाला नाराज करणाऱ्या लोकांसोबत संगत करायचं टाळतो तेव्हा आपण “आदरणीय कामासाठी असलेल्या भांड्यासारखं” ठरत असतो. मग त्या लोकांमध्ये आपल्या कुटुंबातले किंवा मंडळीतले सदस्यसुद्धा असतील. (२ती २:२०, २१) तर मग, आपण नेहमी यहोवावर प्रेम करणाऱ्यांसोबत आणि त्याची सेवा करत राहण्याचं प्रोत्साहन देणाऱ्यांसोबत मैत्री करू या.
वाईट संगत टाळायला शिका हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
वाईट संगतीचा आपल्यावर कोणकोणत्या मार्गांनी परिणाम होऊ शकतो?
-
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले दोन बांधव आणि एक बहीण कशामुळे वाईट संगत टाळू शकले?
-
समंजसपणे मित्र निवडण्यासाठी बायबलची कोणती तत्त्वं तुम्हाला मदत करतील?