व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आपला विवाह टिकवून ठेवा

आपला विवाह टिकवून ठेवा

एक स्त्री आणि पुरूष जेव्हा विवाहाची शपथ घेतात तेव्हा यहोवा अशी अपेक्षा करतो की त्यांनी ती शेवटपर्यंत पाळावी. त्याने म्हटलं की पती-पत्नीने एकमेकांची साथ कधीच सोडू नये. (मत्त १९:५, ६) देवाच्या लोकांमध्ये अशी बरीच जोडपी आहेत, जी आनंदाने आपलं वैवाहिक जीवन जगत आहेत. पण आपण अपरिपूर्ण असल्यामुळे विवाहात समस्या या येणारच. त्यामुळे समस्या येतात, तेव्हा जगातल्या लोकांसारखा आपण असा विचार करू नये की विभक्‍त होणं किंवा घटस्फोट घेणं हाच यावर एकमेव उपाय आहे. मग ख्रिस्ती जोडपी आपला विवाह कसा टिकवून ठेऊ शकतात?

त्यासाठी महत्त्वाच्या पाच गोष्टींकडे लक्ष द्या.

  1. १. विरूद्धलिंगी व्यक्‍तीसोबत जवळीक साधण्याच्या आणि अश्‍लील मनोरंजन पाहण्याच्या मोहापासून सावध राहा. कारण यामुळे तुमच्या वैवाहिक बंधनावर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.—मत्त ५:२८; २पेत्र २:१४.

  2. २. यहोवासोबतची तुमची मैत्री मजबूत करा आणि विवाहाबद्दल त्याने दिलेल्या तत्त्वांचं पालन करून त्याचं मन आनंदित करा.—स्तो ९७:१०.

  3. ३. नवीन व्यक्‍तिमत्त्व परिधान करण्याचा प्रयत्न करत राहा आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मदत करून आपल्या जोडीदाराची कामं थोडी हलकी करण्याचा प्रयत्न करा.—कल ३:८-१०, १२-१४.

  4. ४. एकमेकांशी आदराने वागा आणि अशा गोष्टींवर बोला ज्यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होईल.—कल ४:६.

  5. ५. पती किंवा पत्नी म्हणून आपली भूमिका प्रेमाने आणि आपुलकीने पार पाडा—१कर ७:३, ४; १०:२४.

ख्रिस्ती जोडपी आपल्या नात्याला गंभीरतेने घेतात, तेव्हा ज्याने या नात्याची सुरवात केली त्या यहोवा देवाचा गौरव होतो.

जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे—स्पर्धेचे नियम पाळा  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तर द्या:

  • विवाहाची सुरवात जरी नीट झाली, तरी पुढे कोणत्या काही समस्या येऊ शकतात?

  • आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम आटत चाललं आहे, असं ज्यांना वाटतं त्यांना बायबलच्या तत्त्वांमुळे कशी मदत होऊ शकते?

  • वैवाहिक जीवनात आनंदी होण्यासाठी बायबल तत्त्वांचं पालन करा

    यहोवाने पती-पत्नींसाठी कोणते काही नियम घालून दिले आहेत?

  • आपल्या वैवाहिक जीवनात सुख मिळवण्यासाठी पती-पत्नी काय करू शकतात?