व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

प्रेम व्यक्‍त करायची संधी देणारी अधिवेशनं

प्रेम व्यक्‍त करायची संधी देणारी अधिवेशनं

अधिवेशनांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला इतका आनंद का होतो? कारण या अधिवेशनांमुळे प्राचीन काळातल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपल्यालाही यहोवाच्या हजारो उपासकांसोबत यहोवाची उपासना करायची संधी मिळते. तिथे आपल्याला यहोवाबद्दल खूप काही शिकायला मिळतं. तिथे आपल्याला आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवता येतो. या सगळ्या गोष्टींबद्दल मनापासून कदर असल्यामुळे, आपण अधिवेशनाचा एकही दिवस चुकवत नाही.

अशा प्रकारे आपल्याला एकत्र येण्याची संधी मिळते, तेव्हा आपण फक्‍त स्वतःला कसा फायदा होईल याचाच नाही, तर आपल्या भाऊ-बहिणींनाही कसा फायदा होईल, याचाही विचार केला पाहिजे. (गल ६:१०; इब्री १०:२४, २५) आपण रस्ता अडवून उभं राहू नये किंवा गरजेपेक्षा जास्त जागा राखून ठेवू नये. अशा प्रकारे आपण दाखवून देतो की आपल्याला भाऊबहिणींची काळजी आहे. (फिलि २:३, ४) अधिवेशनात आपल्याला नवीन मित्र बनवता येतात. म्हणून आपण कार्यक्रम सुरु होण्याआधी, ब्रेकमध्ये आणि कार्यक्रम संपल्यानंतर निदान एका तरी अनोळखी भाऊ-बहिणीशी बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. (२कर ६:१३) अधिवेशात ज्यांच्याशी आपली ओळख झाली आहे, ते आपले कायमचे मित्र असतील! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नवीन लोक पाहतील की आपण एकमेकांशी किती प्रेमाने वागतो, तेव्हा तेही कदाचित आपल्यासोबत यहोवाची उपासना करायचा निर्णय घेतील.—योह १३:३५.

“प्रेम कधीही नाहीसे होत नाही” आंतरराष्ट्रीय अधिवेशनं  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • २०१९ च्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांसाठी दुसऱ्‍या देशातून आलेल्या पाहुण्यांना भाऊ-बहिणींनी कसं प्रेम दाखवलं?

  • यहोवाच्या लोकांमध्ये असलेलं प्रेम आणि एकता इतकी विशेष का आहे?

  • नियमन मंडळाच्या सदस्यांनी ख्रिस्ती प्रेमाच्या कोणत्या पैलूंवर जोर दिला?

  • अधिवेशनात तुम्ही कोण-कोणत्या मार्गांनी प्रेम व्यक्‍त करू शकता?

    जर्मनी आणि दक्षिण कोरियामध्ये विरोध असतानाही ख्रिस्ती प्रेम कसं टिकून राहिलं?

  • आपला काय निर्धार असला पाहिजे?