ख्रिस्ती जीवन
यहोवाची सेवा करायचं निवडा
तुम्ही एक तरुण बाप्तिस्मारहित प्रचारक आहात का? तुमचा बायबल अभ्यास चालू आहे का आणि बाप्तिस्मा घ्यायची तुमची इच्छा आहे का? पण बाप्तिस्मा घेणं का गरजेचं आहे? समर्पण आणि बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपल्याला यहोवासोबत मैत्री करता येते. (स्तो ९१:१) त्यामुळे आपला जीव वाचू शकतो. (१पेत्र ३:२१) हा निर्णय घेण्यासाठी तुम्ही कोणती पाऊलं उचलू शकता?
तुम्ही जे शिकत आहात तेच सत्य आहे, याबद्दल स्वतःला खात्री पटवून द्या. एखाद्या गोष्टीविषयी शंका असेल तर त्याबद्दल रिसर्च करा. (रोम १२:२) तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायची गरज आहे का, ते तपासून पाहा. आणि असतील तर ते बदल करा. कारण यामुळे यहोवा खूश होईल. (नीत २७:११; इफि ४:२३, २४) शिवाय, मदतीसाठी त्याला प्रार्थना करा. मग तो तुम्हाला त्याची पवित्र शक्ती देऊन योग्य ते बदल करायला मदत करेल. (१पेत्र ५:१०, ११) यहोवाला खूश करण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घ्याल, ती कधीच वाया जाणार नाही. यहोवाची सेवा केल्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळेल, तो दुसऱ्या कशातूनही मिळणार नाही!—स्तो १६:११.
बाप्तिस्म्याचा मार्ग हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
बाप्तिस्मा घेण्यासाठी काहींना कोणत्या काही समस्यांना तोंड द्यावं लागलं?
-
यहोवाला जीवन समर्पित करण्यासाठी तुम्ही आपला विश्वास कसा वाढवू शकता?
-
काहींना बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य ते बदल करायला कोणत्या गोष्टीने मदत केली?
-
जे यहोवाची सेवा करायचं निवडतात, त्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?
-
समर्पणाचा आणि बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो?