ख्रिस्ती जीवन
यहोवा आणि येशूमुळे मिळणारी कायमची सुटका
तुम्हाला दररोज कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं? कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत का? एकटे पालक असल्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला जीवाचा आटापीटा करावा लागतो का? शाळा-कॉलेजमध्ये तुमचे सोबती तुम्हाला खूप त्रास देत आहेत का? तब्येत ठिक नसल्यामुळे किंवा वय वाढत असल्यामुळे तुम्हाला समस्या आहेत का? आज प्रत्येक जण कोणत्या-ना-कोणत्या समस्येला तोंड देत आहे. आपल्या काही भाऊ-बहिणींना एकाच वेळी बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण आपल्याला माहीत आहे, की या समस्या तात्पुरत्या आहेत. आणि लवकरच यातून आपली सुटका होणार आहे.—२कर ४:१६-१८.
आज जरी परिस्थिती कठिण असली तरी आपल्याला या गोष्टीमुळे दिलासा मिळतो, की यहोवाला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. आणि जेव्हा तो पाहतो, की अशा परिस्थितीतही आपण धीर दाखवून त्याला विश्वासू राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. आणि यामुळे भविष्यात तो आपल्याला भरपूर आशीर्वाद देणार आहे. (यिर्म २९:११, १२) येशूलासुद्धा आपल्याबद्दल खूप काळजी आहे. येशूने आपल्याला वचन दिलं आहे की, आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या पार पाडत असताना तो नेहमी ‘आपल्यासोबत असेल.’ (मत्त २८:२०) देवाच्या राज्यात आपल्याला कायमची सुटका मिळणार आहे. भविष्यातल्या या आशेवर जेव्हा आपण खोलवर विचार करतो तेव्हा आपली आशा आणखी मजबूत होते. आणि सध्याच्या समस्यांचा सामना करायचा आपला निर्धार आणखी पक्का होतो.—रोम ८:१९-२१.
वादळ जवळ येत असताना येशूवर आपलं लक्ष केंद्रित करून ठेवा!—राज्याचे अशीर्वाद हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
मानव देवापासून कसे दूर गेले आणि त्याचा काय परिणाम झाला?
-
जे यहोवाला विश्वासू राहतात त्यांना भविष्यात कोणती आशा आहे?
-
हे चांगलं भविष्य मिळवणं आपल्याला कशामुळे शक्य झालं आहे?
-
देवाच्या नवीन जगात तुम्ही कोणत्या गोष्टी पाहण्यासाठी आतुर आहात?