देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
सुटकेचं वर्ष आणि भविष्यात मिळणारी कायमची सुटका
सुटकेच्या वर्षामुळे आयुष्यभर कर्जात अडकून राहण्यापासून आणि गरीबीपासून इस्राएली लोकांची सुटका व्हायची. (लेवी २५:१०, टेहळणी बुरूज१९.१२ ८ ¶३; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)
इस्राएलमध्ये जमीन ही फक्त ठेक्यावर विकली जायची. आणि सुटकेच्या वर्षापर्यंत जितकं उत्पन्न होईल, त्या उत्पन्नाच्या आधारावर जमिनीची किंमत ठरवली जायची. (लेवी २५:१५; इन्साइट-१ १२०० ¶२)
जेव्हा यहोवाच्या लोकांनी सुटकेच्या वर्षाबद्दल असलेले नियम पाळले, तेव्हा यहोवाने त्यांना आशिर्वाद दिले (लेवी २५:१८-२२, इन्साइट-२ १२२-१२३)
भविष्यात देवाच्या विश्वासू सेवकांना एका लाक्षणिक सुटकेच्या वर्षाचा फायदा होईल. तो म्हणजे, त्यांना पाप आणि मृत्यूपासून कायमची सुटका मिळेल.—रोम ८:२१.
यहोवा भविष्यात आपल्याला जी कायमची सुटका देणार आहे, ती मिळवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने काय केलं पाहिजे?