ख्रिस्ती जीवन
पालकांनो, आपल्या मुलांना जे गरजेचं आहे ते सांगा
आपण अशा जगात राहतो, जिथं चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हटलं जातं. (यश ५:२०) काही लोक अशा गोष्टी करतात ज्या गोष्टींची यहोवाला घृणा वाटते. जसं की पुरूष, पुरुषांसोबत आणि स्त्रिया, स्त्रियांसोबत लैगिंक संबध ठेवतात. शाळेत असणारी मुलं किंवा इतर जण तुमच्या मुलांवरही वाईट कामं करायचा दबाव आणू शकतात. मग अशा प्रकारच्या दबावांचा सामना यशस्वीपणे करायला तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता?
यासाठी मुलांना यहोवाच्या नजरेत काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, ते शिकवलं पाहिजे. (लेवी १८:३) मुलांचं वय लक्षात घेऊन, त्यांना हळूहळू या गोष्टीची माहिती द्या, की बायबल योग्य लैगिंक संबंधाबद्दल काय म्हणतं. (अनु ६:७) स्वतःला विचारा: ‘मी माझ्या मुलांना याबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल शिकवलं आहे का? जसं की, प्रेम व्यक्त करायची कोणती पद्धत योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे? संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे घालणं का महत्त्वाचं आहे? इतरांनी आपल्या शरीराला पाहणं किंवा अयोग्य पद्धतीने स्पर्श करणं का चुकीचं आहे? जर कोणी आपल्या मुलांना अश्लील चित्रं दाखवली किंवा यहोवाला आवडत नाही असं काहीतरी करायला सांगितलं, तर अशा वेळी काय केलं पाहिजे हे माझ्या मुलांना माहीत आहे का?’ मुलांना आधीच या गोष्टींबद्दल माहिती दिल्यामुळे त्यांना पुढे येणारे धोके टाळता येतील. (नीत २७:१२; उप ७:१२) अशा प्रकारे मुलांना प्रशिक्षण दिल्यामुळे तुम्ही हे दाखवून देता, की मुलं ही यहोवाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे आणि तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे.—स्तो १२७:३.
टिकून राहील असं घर बांधा—वाईट गोष्टींपासून तुमच्या मुलांचं रक्षण करा हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या:
-
आपल्या मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल माहिती द्यायला काही पालकांना संकोच का वाटतो?
-
पालकांनी आपल्या मुलांना “यहोवाच्या शिस्तीत आणि शिक्षणात” का वाढवलं पाहिजे?—इफि ६:४
-
संघटनेने पुरवलेल्या कोणत्या साहित्यांचा वापर करून पालक आपल्या मुलांना लैंगिक गोष्टींबद्दल माहिती देऊ शकतात?—टेहळणी बुरूज१९.०५ १२ वरील चौकट
-
आपली मुलं मोठ्या समस्येत अडकण्याआधीच आपण त्यांच्याशी या विषयावर नियमितपणे बोलणं का गरजेचं आहे?