ख्रिस्ती जीवन
सर्व भाषेच्या लोकांना प्रचार करण्यासाठी संघटित
प्राचीन काळात यहोवाने इस्राएली लोकांना संघटित केलं होतं. आणि आजसुद्धा यहोवा त्याच्या लोकांना त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी संघटित करत आहे. लोकांपर्यंत आनंदाची बातमी पोहचवण्यासाठी जगभरातली शाखा कार्यालयं, मंडळ्या आणि प्रचारकार्याचे गट एकत्र मिळून काम करत आहेत. म्हणूनच प्रचाराचं काम वेगाने होत आहे. आपण सगळ्यांनाच राज्याचा संदेश सांगायचा प्रयत्न करतो. अगदी अशांनाही ज्यांना आपली भाषा बोलता येत नाही.—प्रक १४:६, ७.
लोकांना सत्य शिकवण्यासाठी तुम्ही एखादी नवीन भाषा शिकून घ्यायचा विचार केला आहे का? नवीन भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ देणं जर तुम्हाला शक्य नसलं, तर तुम्ही JW Language ॲपचा वापर करू शकता. या ॲपच्या मदतीने तुम्ही नवीन भाषेत प्रचार कार्यात सुरुवात कशी करायची ते शिकू शकता. आणि त्यामुळे तुम्हीही पहिल्या शतकातल्या बांधवांना मिळालेला आनंद अनुभवू शकता. या बांधवांनी जेव्हा विदेश्यांना त्यांच्या भाषेत “देवाच्या अद्भुत गोष्टींबद्दल” सांगितलं तेव्हा त्यांना खूप नवल वाटलं.—प्रेका २:७-११.
यहोवाचे मित्र बना—वेगळ्या भाषेत प्रचार करा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
तुम्हाला JW Language ॲपचा वापर कधी करता येईल?
-
या ॲपची काही वैशिष्ट्यं कोणती आहेत?
-
तुमच्या क्षेत्रात लोक कोणकोणत्या भाषा बोलतात?
-
दुसरी भाषा बोलणारी एखादी व्यक्ती जर राज्याच्या संदेशात आवड दाखवत असेल तर तुम्ही काय करू शकता?—संगठित १००-१०१ ¶३९-४१