देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
शौल सुरुवातीला नम्र होता
शौल नम्र होता आणि त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती, म्हणून त्याला वाटत होतं की तो राजा बनण्यासाठी योग्य नाही (१शमु ९:२१; १०:२०-२२; टेहळणी बुरूज२०.०८ १० ¶११)
काही लोकांनी शौलला तुच्छ लेखलं, तेव्हा तो त्यांच्यावर चिडला नाही (१शमु १०:२७; ११:१२, १३; टेहळणी बुरूज१४ ३/१५ ९ ¶८)
शौलने पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनानुसार काम केलं (१शमु ११:५-७; टेहळणी बुरूज९५ १२/१५ १० ¶१)
नम्र असल्यामुळे आपण यहोवाच्या सेवेत मिळणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल आणि आपल्या क्षमतांबद्दल बढाई मारणार नाही. तर त्या यहोवामुळेच मिळाल्या आहेत हे आपण लक्षात ठेवू. तसंच, आपण नेहमी यहोवाकडे मार्गदर्शन मागत राहू.—रोम १२:३, १६; १कर ४:७.