व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

देवाच्या वचनावरचा तुमचा विश्‍वास मजबूत करा

देवाच्या वचनावरचा तुमचा विश्‍वास मजबूत करा

देवाचं वचन आपलं जीवन पूर्णपणे बदलू शकतं. (इब्री ४:१२) पण त्यात दिलेल्या मार्गदर्शनाचा, सूचनांचा आणि सल्ल्यांचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला याची पूर्ण खातरी असली पाहिजे, की ते “देवाचं वचन” आहे. (१थेस २:१३) तर मग आपण देवाच्या वचनावरचा आपला भरवसा कसा वाढवू शकतो?

दररोज बायबलचा काही भाग वाचा. वाचत असताना असे पुरावे शोधायचा प्रयत्न करा ज्यामुळे यहोवाच बायबलचा मूळ लेखक आहे याची तुम्हाला खातरी होईल. उदाहरणार्थ, बायबलमधल्या नीतिवचनं या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यांचं परीक्षण करा. आणि त्यातली तत्त्वं जुन्या काळाप्रमाणे आजसुद्धा कशी उपयोगी आहेत यावर विचार करा.​—नीत १३:२०; १४:३०.

एखादा विषय घेऊन त्यावर संशोधन करा. बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलं आहे याच्या पुराव्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक,  या पुस्तकात “बायबल” या विषयाखाली दिलेल्या सूचीमध्ये “देवप्रेरित” हा विषय पाहा. तसंच, नवे जग भाषांतर  यात दिलेला क३ हा अतिरिक्‍त लेखसुद्धा पाहा. त्यामुळे बायबलमधल्या संदेशात कोणताही बदल झालेला नाही या गोष्टीवरचा तुमचा विश्‍वास आणखी वाढेल.

आपण यावर विश्‍वास का ठेवतो . . . देवाचं वचन,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • इजिप्तमधल्या कर्नाक मंदिराच्या भिंतीवर सापडलेल्या लिखाणातून देवाचं वचन खरं असल्याचं कसं दिसून येतं?

  • बायबलचा संदेश बदललेला नाही असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

  • बायबल आजपर्यंत जसंच्या तसं टिकून आहे, यावरून ते देवाचं वचन असल्याचं कसं सिद्ध होतं?​—यशया ४०:८ वाचा.